STORYMIRROR

Vilas Kumbhar

Others

4  

Vilas Kumbhar

Others

माझी आजी

माझी आजी

1 min
214

होती आजोळची ओढ, होती गोड माझी आजी, 

सुट्टीत मी जाता,सारी चंगळ नी मौजच मौज माझी. 

      आजी माझी मृदू, होती लोण्याहून मऊ, 

      चंद्राहून शितल माया, किती गुण गाऊ. 

      तेल अंगाला लावून घालायची मज न्हाऊ, 

      लोणी भाकरीला माखून, घालायची खाऊ. 

प्याला पहिला मज, म्हशीची काढता धार, 

फेसाळलेले दूध पिता, ओठांवर शुभ्र कोर. 

पदराने पुसता ते, येतसे भरून तिचे ऊर. 

लाडका मी नातू, सगळ्यांनाच लळा फार. 

      होती आजी थकली, अंथरूणाला खिळली, 

      एकच मनी ध्यास, नातू तिचा असावा जवळी. 

      दारात मी उभा, दृष्टी अधु जरी मज न्याहाळी. 

      आला माझा विलास, म्हणत चेह-यावर झळाळी. 

उलटली होती शंभरी, तरी घरची सर्व कामे करी. 

अशी माझी आजी, होती मज देवाहून प्यारी. 

माया तिची माझ्यावर,श्रावणी बरसणा-या सरी. 

सय येता द्रवले मन ,आसवे दाटली नयनांबरी. 


Rate this content
Log in