STORYMIRROR

Rajesh Varhade

Children Stories

4  

Rajesh Varhade

Children Stories

माझी आई

माझी आई

1 min
314

माझी आई

माझी आई सदैव 

कृपेचा सागर 

करी बाळावर 

माया अपार


तिच्या प्रेमाची ग्वाही 

तिन्ही लोकात 

माझ्यासाठी आई 

परमेश्वर साक्षात


तिचे उपकार 

जन्मा सात 

फिटणार नाही ना 

व्हावे सादर सेवेत


आईचे उपकार 

कसे उतराई 

नाव करूनी 

करावी नवलाई


लिहावे किती आई 

वरच सांगा 

लिहिण्या आकाश 

समुद्र शाही मांगा


Rate this content
Log in