माझे बदलते गाव
माझे बदलते गाव
1 min
444
माझे गाव आता
गबाळ राहिला नाही
शिक्षणाची धरुन कास
कसबीने जाणले विज्ञानहि
तंत्रज्ञानाची स्विकारली साथ
पारंपारीक शेतीची टाकली कात
व्यापार व्यसायाची शिकले जुगाड
करायची आहे दुष्काळावर मात
पण वीसरलो नाही संस्कार
आज ही होतो गाव एक सुखदुखात
गावात साजरे होतात सणवार
आज ही होतात गप्पा गोष्टी दिनरात
गावात जपले जाते गावठाण
प्रौढाणा मिळतो रीतसर मानपाण
मुले आहेत स्पर्धेपासून अजाण
शिक्षकांच्या कष्टाचे गावाला असते भाण
जपून जुन्या परंपरा
माझे गाव बदलते आहे
मोडून सारी बंधने
नवे बदल स्विकारत आहे
