माझे बालपण
माझे बालपण
1 min
248
रम्य त्या आठवणी
आहे माझ्या बालपणी
दुडूदुडू धावते अंगणी
बाबाचे बोट धरूनी
बोबड्या बोलात
टाळ्या वाजवी तालात
झोक्यावरी झुले
आनंदाने डुले
बोटाला धरूनी
आ अक्षर गिरवी
माझी कोरी पाटी
बाबाला म्हणे मी
होईल तुझी काठी
लहानपण देगा देवा
वाटे लहानांचा हेवा
आहे बालपण अनमोल ठेवा