माझे बालपण
माझे बालपण
1 min
105
कलिकेसम मृदुल
सुंदर ते सारे क्षण
निरागस कोवळे
ते सोनेरी बालपण
अवखळ चंचल भारी
ना भय ना चिंता कसली
'परी' नव्हते आकाशीची
परी साऱ्यांची लाडली
खेळ बाहुल्यांच्या संगे
भातुकलीत रमून जाणे
मधुर सुरांच्या संगे
जगताना जीवनगाणे
सदैव वाटे मनात माझ्या
आसक्ती मोठे होण्याची
पण मातृकुशीतच होती
सुखे तिन्ही लोकींची
