माझे बाबा
माझे बाबा
रामराज्य आणि नंदाचं गोकुळ
आमच्याच घरात पाहिला मिळालं
अश्या ह्या सुंदर कुटूंबात मला
ज्ञानामृताचा बाळकडू मिळालं
रामराव आणि लीला
जणू वासुदेव देवकी
त्यांच्या घरी जन्मले
माझे बाबा उत्तम तिथी
समजूतदार आज्ञाधारक
आहेत खुपचं हुशार
जिद्दीने आणि मेहनतीने
सांभाळत आहेत आपला परिवार
व्यवसायाने वकील असले जरी
तरी समाजहिताचे जबाबदारी
करतात उत्तमरीत्या पुरी
माणुसकीची जाणीव आहे त्यांना खरी
सर्व सामान्यांना मोफत देतात सल्ला
न घेता त्यांच्याकडून कुठला मोबदला
वडील म्हणून आहेत ते खुपचं महान
दोन्ही मुली असलो तरी देतात वागणूक मुलासमान
उणीव कधी कुठली भासू दिली नाही
कमतरता कशाची होऊ दिली नाही
शिक्षणाचे हट्ट सारे केले आमचे पुरे
माझ्या आयुष्यातील तेच हिरो खरे
माझे आणि बाबांचे नाते अजोड
जगात त्याला कसलीच नाही तोड
हात त्यांचा कायम माझ्या डोहिवरी असावा
आशीर्वाद त्यांचा नेहमीच माझ्या पाठीशी असावा