माझे बाबा🤴🏻❤️...
माझे बाबा🤴🏻❤️...
बाबा..! किती कौतुक केलं असतं, तुम्ही माझी वाहवा होताना बघताना,
मलाही किती बरं वाटलं असतं, तुमच्या कडून कौतुक करून घेताना.....!
आज जरी तुम्ही दूरवर असला तरी, आमच्या रक्तात तुम्ही सामावलात,
तुमचाच आहे वाटा माझ्या प्रत्येक यशात, तुमच्या प्रेमाच्या हाकेसाठी मी आहे वाट पाहत......!
तुमचे शब्द अजूनही कानात गुंजतात, तुमच्या आठवणीने डोळेही पाझरतात,
मनात उफाळून आलेल्या भावना मात्र झुरतात, काळजात तुमच्या उणीवेचे सुर दाटतात........!
बाप आहे सोबत तर, मुलांची सर्व स्वप्न आहे,
आणि बाप आहे त्या बाजारातली, सर्व खेळणी आपली आहे.....!
कधी चुकले पाऊल तर सावरले, कधी हरवल्या दिशा तर दाखवले,
जगामधील सर्वात मोठे स्थान बाबांचे, मला जगणे शिकवून एक व्यक्ती बनवले......!
