माझा सखा
माझा सखा
1 min
347
आला नाही परतुनि सखा माझा
वाट बघते मी दाराकडे लागले डोळे
दुर्ग दिसताच येताच सुगंध येण्याचा
लाजून चूर झाले बहरूनी मी गेले
आणला मजसाठी गजरा मोगऱ्याच्या
हळूच माळला केसात माझ्या
बेधुंद झाले मी त्या गंधित मोगऱ्याने
डोळे मिटून घेतले त्या धुंद श्वासाने
चाहूल लागली मजा मंद चांदण्याची
लपवली आठवणी त्या ठेवता हृदयामधी
मौनात आज गेले हे बरसून चांदणी
स्वप्नात कधी गेले हे मज ना कळले
