STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

माझा परिवार

माझा परिवार

1 min
2.9K

माझा परिवार सुखी परिवार

सर्वांच्या भेटीचा दिन रविवार


माझ्या परिवारात नाही तंटा

कामासाठी नाही नकार घंटा


माझा परिवारात आहे माया

वेळ घालवित नाहीत वाया


माझ्या परिवाराला मोठ्यांचे आशीर्वाद

येथे होत नाहीत कोणतेच वादविवाद


माझ्या परिवारात आहे नीतिमत्ता

म्हणूनच सर्वात दिसते गुणवत्ता


माझा परिवार सर्वांसाठी आदर्श

त्यांना पाहून मनात होतो हर्ष


माझा परिवार आहे परोपकारी

प्रेमाचा संदेश पोहोचवी घरोघरी


माझा परिवार आहे संस्कारी

तेच गुण घेऊन जाई परक्या घरी


माझा परिवार आहे स्वर्गाहून सुंदर

प्रत्येकजण होऊ पाहतो सिकंदर


माझा परिवार आहे सर्वांसाठी प्रेरणा

वागणुकीतून मिळते दुसऱ्यांना चालना



Rate this content
Log in