माझा देश
माझा देश
1 min
321
एक होता असा काळ
तिथे नव्हती कोणती साधने
होता शिक्षणाचा अभाव
अशी होती माझ्या देशात खेडोपाडी गावे ।।1।।
एक होता असा काळ
तिथे होती निरक्षरता
अन्याय झेलत खितपत
पडलेला समाज सारा होता ।।2।।
आज एक नवयुग असं आहे
गावागावात शाळा रस्ते आहे
प्रगतीच्या नवीन वाटा आहे
माझा भारत देश जगात उगवता तारा आहे ।।3।।
