STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Others

4  

Mahesh V Brahmankar

Others

माझा भारत महान

माझा भारत महान

1 min
565

अभिमानाने वाटते, तिरंगा माझी शान, माझा भारत महान!

विविधतेत एकता, जपतो किती छान!!

प्रेमाची तलवार जिथे, सुरक्षेची म्यान!

भाषा जरी अनेक, तरी ठेवतो आम्ही एकमेकांची जाण!!

म्हणून अभिमानाने वाटते, तिरंगा माझी शान, माझा भारत महान!!१!!


माणुसकी हाच धर्म, 

जिथे स्त्री जातीचा ठेवतो आम्ही मान!!

साधुसंतांची भूमी,

जिथे सदाचारांची ठेवतो आम्ही जाण!!

म्हणून अभिमानाने वाटते, तिरंगा माझी शान, माझा भारत महान!!२!!


समुद्रासम विशाल देश माझा!

संकटसमयी, जिथे सद्भाव होतो जागा!!

जेव्हा सीमेवर, गनिमी राष्ट्र करते कुरघोडी!

शत्रुलाही लाजवेल, अशी सर्जिकल स्ट्राईकची करतो आम्ही खेळी!!

म्हणून अभिमानाने वाटते, तिरंगा माझी शान, माझा भारत महान!!३!!


शेतीप्रधान देश माझा!

बळीराजा शेती कसतो किती छान!!

बलाढ्य लोकसंख्येचा देश माझा!

विविध सण साजरा करून एकोपा जपणारा देश माझा महान!!

म्हणून अभिमानाने वाटते, तिरंगा माझी शान, माझा भारत महान!!४!!


Rate this content
Log in