माझा बाप
माझा बाप
1 min
168
कुटुंबात बाप नावाचा दरारा असतो
त्याच्या छायेखाली सुखाचा वारा असतो
कुटुंबात बाप नावाचा धाक असतो
सर्वाना एकत्र वाहून नेणारा चाक असतो
बाप हा सर्व काही सहन करतो
सर्वांचे दुःख नि संकटे दहन करतो
बाप बाहेरून कडक आतून प्रेमळ
मन त्याचे गंगेच्या पाण्यावाणी निर्मळ
बाप म्हणजे फणस कडक नि मऊ
त्याचे विचार सर्वाना समानतेने वागवू
बाप वाहून नेतो सर्वांची जबाबदारी
त्याच्याच खांद्यावर सर्वांची जिम्मेदारी
बाप घरातील सर्वांची असतो सावली
प्रेमाने सर्वजण म्हणती त्याला माऊली
