STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Others

माझा बाप शेतकरी

माझा बाप शेतकरी

1 min
403

ऋतू कोरडा वाहिला

जसा आला तसा गेला

ओल सरली डोळ्यांची

श्वास चातके सोडला...||१||


मैलमैल चाललेल्या

पावलांची पायपीट

वैशाखात पोळूनिया

जमवला घोट-घोट...||२||


मन बाप आभाळाचं

यंदा का गं थिटं बाई

देई चुकारा मेघूट

विरहात काळी आई...||३||


कूस उजवाया तिची

विठू जा रे बरसून

तुझ्या आशेवर श्वास

देई सुगंधाचं दान... ||४||


डोळ्यांतून टिपूसही

आता गळेनासा झाला

माय 'गोदा' हो उशाशी

तरी कोरड घशाला...||५||


बाप माझा शेतकरी 

जीर्ण त्याचा जीव झाला

बहू राबला झिजला

तरी रिता परतला||६||


पांडुरंगा देई यश

यत्ने पाहतो सावरु

बघवेना ही यातना

चैतन्याचा दे बहरु...||७||


टाक ओंजळीत देवा

थेंब चार मोतीयांचे

दुष्काळाच्या काळोखात

आनंदकिरण दे उजेडाचे ||८||


नको करुस हताश

भीक घाल रे श्वासांची

देई मोल त्या घामाचं

भर कणसं मोत्यांची... ||९||


Rate this content
Log in