STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

माझा बाप कौटूंबीक

माझा बाप कौटूंबीक

1 min
248

माझा बाप कौटूंबीक 

"कौटूंबीक वटवृक्ष" 

कुटुंबाला सांभाळण्या

सांभाळण्या असे दक्ष//

घरट्यात प्रपंची या

या झिजती माझे बाबा

देती माया,स्नेह खुप 

खुप जपे मला बाबा //

आमच्या या जीवनात 

जीवनात सुखी छाया

रहावी म्हणुन झटे 

झटे रात्रंदिन काया //

तळहाता फोडासमं 

फोडासमं जपलय  

शाळेमध्ये स्व:ता नेती 

नेती हात धरूनिया //

अंतरात माया वाहे

वाहे जशी नदीवाणी

त्यात वाहे प्रेमधार

प्रेमधार संतवाणी//

राग लोभ समजुन 

समजुन घेत असे 

कधी पण माझे बाबा

बाबा गमंतीत हसे//

बाप मायाळु हा माझा 

माझा जसा उभा शिखर   

केला उभा साम्राज्याचा 

साम्राज्याचा हा सागर//

सुखेदुखे जगतांना

जगतांना पचवूनी

अंगभर करे कष्ट

कष्ट ही घाम गाळून//

मुखावर सदा तेज

तेज प्रसन्न हास्याचा 

मला दिसे बाबा देव

देव श्रीराम रूपाचा//

मला लाभलेत बाबा

बाबा इश्वरीय पुन्य

जगी प्रेमळ ना कोणी

कोणी बाबासमं अन्य//



Rate this content
Log in