STORYMIRROR

Rucha Rucha

Others

4  

Rucha Rucha

Others

माझा अभिमान-भारत

माझा अभिमान-भारत

1 min
458

संस्कृतीचा वारसा लाभलेला

भारत माझा आहेच महान

काय वर्णू मी गीत तयाचे

अजाण बालक मी लहान ।।


मंगल पावन भूमी माझी

राम कृष्ण येथे जन्मले

बाळ शिवबाच्या पराक्रमाने

स्वराज्याचे उद्यान फुलले ।।


काश्मीर शोभते मुकुट शीराचे

आहे आम्हां तयाचा अभिमान

देशावरचे निस्सीम प्रेम दर्शविते

असेच आहे आमुचे राष्ट्रीय गान


त्रिरंगानी फडकतो आहे

ध्वज आकाशी उंच उंच

जय जय भारत जयघोषाने 

गर्जुदे सारा आसमंत


साहित्याला गुण द्या
लॉग इन