माहेरची झोप
माहेरची झोप
1 min
140
एका क्षणाची झोप माहेराची
देई दौलत खूब आरामाची
रात्री उशीरा मैफल गप्पा
तेल मालिशचा नंतर टप्पा
हात हळुवार केसातून फिरता
व्याकुळ मन मग शांत होता
नुरे कोणताच प्रश्न बाई
सारं समजून घेते आई
नाही गजर नाही काटा
हवे तेव्हढे उशीरा उठा
उठता उठता यतो हातात
गरमा गरम चहा कपात
अशी निवांत बिनधास्त खूप
थोडीशी बेजबाबदार माहेरची झोप.