STORYMIRROR

Raghu Deshpande

Others

3  

Raghu Deshpande

Others

मागणें....

मागणें....

1 min
152

आज थोडं हलक केलं

मन शब्दांनी रित केलं...


ओझे होतें सारे विचार

कधी न तुझा तो होकार

बांध तोडून शेत जरा

माझे मीच मोठ केलं...


कधी तरी होणार होते

भाव मनी दाटलें होते

तुला पटेल किंवा नाही

माझी बाजू कथन केलं...


किती कुढावे आत आत

तुला न काही रीतभात

केव्हा तरी निर्णय व्हावा

हेच एक मागण केलं....


सारे काही तुझेच हाती

करी स्विकार, हो सांगाती

धनु पेललें हे शिवाचे

स्वयंवरी ते मी तोडलं...



साहित्याला गुण द्या
लॉग इन