माघी वरदविनायक
माघी वरदविनायक
1 min
179
उंदरावर स्वार होऊन
लाडके वरदविनायक आले
स्वागत त्यांचे जल्लोषात
ढोल-ताशांच्या गजरात करू।।1।।
न मागता तुच देतोस
नाही काही विनवणी
डोळे आनंदाने आले
हे पहा तुज पाहून भरून।।2।।
बेल दुर्वा त्यासी वाहुया
मोदक चला देऊ
बाप्पा विनायकाला चला
प्रेम भावे वंदुन नतमस्तक होऊ।।3।।
