Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Others

3  

Sangita Pawar

Others

माघी श्री गणेश जयंती

माघी श्री गणेश जयंती

1 min
270

माघी मासी शुद्ध चतुर्थी

असे श्री गणेश जयंती

चौदा विद्यांचा अधिपति

अथर्वशीर्षाचे पठण करती ||

गणपतीचे अवतार तीन

तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा

म्हणे याला तिलकुंद चतुर्थी

नैवेद्य तिळाच्या लाडवाचा||

कथा असे या जयंतीची

नरांतक राक्षसा मारण्याची

कश्यपाच्या पोटी विनायक

अवतार घेऊनी प्रकटल्याची ||

माघी गणपतीला वाहती

एकवीस दुर्वांची जुडी

गणपती असे मातृप्रिय

२१ मातृ देवांची सेवा घडी ||

माघी शुक्ल गणेश चतुर्थीस

करी गणेशाची आराधना

दैवी सुख प्राप्तीची ख्याती

त्याच्या पूर्ण होई मनोकामना ||

Rate this content
Log in