म, मातृभाषेचा
म, मातृभाषेचा
मराठी बोली
ऋण तुझे खूप
जसे तू मायेचे दुसरे रूप
नव महिने जगलो स्वर्गात
आता आयुष्यभर श्वास घेतोय तुझा गर्भात.
लडीवळा मायेच्या पदरात बागडलो
तुझा सावलीत नावा रुपाला आलो !१!
बोले शब्द पहिला आई तोही मराठी
मुखी गोड गुणगान सुख मराठी
भाषाही हृदयाची गाठ जाण मराठी
कवी आहे मी तुझा अनोखा प्रवासी
पेटवत आहेस तू अंतःकरनात शब्दांची भटी
तू ज्ञानाची साक्ष्यात सरस्वती!!२!!
महाअनुभव पंतांची पोती यज्ञा
ज्ञानेश्वरीची महाज्ञानी संज्ञा
तरली तुकोबाची अभंग गाथा
शब्द बनले मुखी विठ्ठल प्रतिज्ञा.!!!३!!!
शिवरायांचा मुकुट मराठी
शिव तलवारीचे पाते मराठी
स्वराज्याचा सूर्य मराठी.
लढले मावळे ते सूर मराठी...
म.शिवाजी महाराजांचा
म.मातृभाषेचा !!!!४!!!!
