लवचिक मन
लवचिक मन
1 min
138
लवचिक मन, चंचल
फिरे सर्वत्र सैरभैर,
कधी उडे आकाशात
तर कधी धरे स्वतःशीच वैर!!
दुःखाचे ओझे वाहती
सुखात आनंदात डोलती,
कधी दाखवी मोठेपणा
मना मना समजून घेती.
शुद्ध मन, शुद्ध चित्त,
विचार परिपक्व बनवती,
मनास हळुवार विचारून
कार्यसिद्धी नेण्यास धावती.
जटील जरी पेश्या आपल्या
हृदयाचे संबंध जोडी मनाशी,
कधी भावूक कधी कणखर
मनाचे नाते जुळवि जीवनाशी!!
