लुटारू
लुटारू
1 min
312
सज्यनावाणी वागती सारे
मनात पण हा विकार आहे
दिसते वरून चांगलेच सारे
पण आतून सारे भुसार आहे
स्वार्थी झाले जगात सारे
चांगुलपणाचा दिखाव आहे
स्वार्थ सधीत चलती सारी
जो तो इथं लुटार आहे
आपुलेना अता इथे ना कोनी
नात्यांचा सारा बाजार आहे
जळती एकमेकांन वरती सारी
भेदभावनेचा हा आजार आहे
बाता ती करती मोठं मोठ्या
जो तो इथं काम चुकार आहे
चहा पाण्याविना नाही होत काम
जागोजागी हा भ्रष्टाचार आहे
विश्वास नाही कोणावरती
घात करती ती गद्दार आहे
स्वार्थ सधीत चलती सारी
जो तो इथं लुटार आहे
