लॉकडाऊन
लॉकडाऊन
आयुष्यात आधी कधी असं पाहिलं नव्हतं
वातावरण शुद्ध आहे पण तरीही मास्क वापरणे बंधनकारक आहे
रस्ते रिकामे आहेत पण लाॅंग ड्राईव्हला जाता येत नाहिये
सॅनिटायझरने सर्वांचे हात साफ आहेत पण हात मिळवता येत नाहिये
मित्रांकडे जायला वेळ आहे पण सर्वांचे दरवाजे बंद आहेत
गंगा साफ झाली आहे पण गंगेचं पाणी पिणे नशिबात नाहिये
प्रत्येकाच्या आत दडलेला स्वयंपाकी बाहेर येत आहे पण केलेले पदार्थ खायला कोणाला बोलावता येत नाहिये
आता ऑफिसला जायचा कंटाळा नाहिये पण ऑफिसमध्ये मोठा विकेंड आहे
ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना खर्च करायला सर्व मार्ग बंद आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचे कमाईचे सर्व मार्ग बंद आहेत
वेळ भरपूर आहे पण काय करावं हे सुचत नाहिये
आणि कोणी जवळचा हे जग सोडून गेला तर त्याला अखेरचा निरोप द्यायला सुद्धा जाता येत नाहिये
सर्व काही असून काहीच नाहिये
सर्व काही असून काहीच नाहिये
