STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min
172

लॉकडाऊन सगळ्यासाठी आहे

पण तिच्यासाठी नाही।।

तीच आपलं घरात सारख काम चालू असत काही ना काही।।

सकाळपासून तिला सांगा ना उसंत असते का?।।

किती बारीकसारीक कामे असतात तिला आपल्याला घरात बसल्यावरच दिसते ना।।

सकाळपासून आज माझ लक्ष होत तिच्याकडे।।


घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम तिच चाललेल।।

आपल्या संसाराचा गाडा ओढताना प्रत्येकाची ती ठेप ठेवत होती।

कोणावरही न रागवता ती तिची शांततेत जबाबदारी पार पाडत होती।।

मी तर घरी बसून बघत होतो तिचे सारे कष्ट।।


एरवी ती घरी बसून काय काम करते याचे उत्तर मिळाले मला स्पष्ट।।

लोकडाऊनच्या तणावाने होती जरी ती त्रस्त।।

घरातील सगळ्यांची जबाबदारी ती हसतमुखाने पार पडत होती मस्त।।

हसतमुखाने पार पाडत होती मस्त।


सर्व स्त्रियांना समर्पित


साहित्याला गुण द्या
लॉग इन