STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

लोकसंख्येचा पोवाडा

लोकसंख्येचा पोवाडा

1 min
41.2K


लोकसंख्येचा पोवाडा

कृपा करून लोकसंख्येला।आळा तुम्ही घाला।देश विकासाला ।

सुख आहे छोट्या कुटुंबात ।जीव नको धोक्यात ।

कुटुंबापासून करा सुरुवात । जी जी जी

मुजरा प्रत्येक भारतीयाला।आवरा लोकसंख्येला।

मोठे आव्हान युवा वर्गाला।सर्व धर्माची एकता साधन्याला।

स्वावलंबी भारत करण्याला। कुटुंब नियोजन करण्याला।जी जी जी

निसर्ग सौंदर्य देशाला।संतांच्या भूमीला।भारताच्या संस्कृतिला।भारताच्या महान खजिन्याला।लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याला।जी जी जी

साक्षर भारत करण्यला।अंधश्रद्धा संपवंण्याला।

विज्ञानाचा सल्ला जनतेला।घातक विचार संपवण्याला।

मुलगा ,मुलगी समानतेला।जी जी जी

मोठ्या कुटुंबात ओढाताण।येते भिकारीपण,लाचारीपण।

उपासमारीने येते मरण।जगात उंचवावी मान।जगावे स्वच्छंदी जीवन।रहावे स्वाभिमानाने।जी जी जी

आता संपवितो इथे पोवाडा।सर्वानी ठेवा मनी।नाहीतर देशाची होईल हानी।अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण।

घ्या मूलभूत गरजा समजून।निसर्गाचे करा जतन।जी जी जी


Rate this content
Log in