STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

लोकसंख्या

लोकसंख्या

1 min
266

अश्मयुगीन काळातील लोकं गुहेत राहत होती

वनातील कंदमुळे फळे खाऊन जीवन जगत होती

लागला अग्नीचा शोध मग चाक लागले पळू

आदिमानव स्थिर जीवनाकडे लागला वळू

पाण्याच्या जवळ राहून ते शेती करू लागले

पाहता पाहता मानवांचे राहणीमान बदलून गेले

लोकं वाढू लागली तशी अनेक प्रश्न झाले निर्माण

अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी निसर्गाचे झाले निर्वाण

बघता बघता कशी जगाची या समस्या ही वाढली

सारी जंगले साफ करून लोकांनी मोठी घरे बांधली

येणारा भविष्यकाळ पहा सर्वांसाठी असेल अवघड

आपलीच माणसं आपल्यासाठी होतील अवजड

लोकसंख्या वाढली तशी झाला पर्यावरणाचा ऱ्हास

खायला मिळेना अन्न जगण्याचा होऊ लागला त्रास

सरकारने केला आहे कायदा हम दो हमारे दो

लोकसंख्या आवरण्यासाठी सर्वांनी मंत्र जपा हो


Rate this content
Log in