STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

1.0  

Sanjay Raghunath Sonawane

Others

लोकसंख्या गीत

लोकसंख्या गीत

1 min
29.2K


शाळेत रोज रोज जाऊ या

लोकसंख्येचे शिक्षण घेऊ या

लोकसंख्येने जनता बेजार

प्रश्न सोडवू आपण बालकवीर


खेडया पाड्या, वस्ती शहरातून

शाळा, महाविद्यालयातून

करू लोक जागृती भारत भर

देऊ संदेश आपण जगभर


ह्या लोकसंख्येच्या पाई

देश अधोगतीला चालला लई

शिक्षण देऊ खेड्या, पाड्याला

आदिवासी, डोंगराळ भागाला


ह्या लोकसंख्येच्या पाई

नोकरी, शिक्षण मिळत नाही

अन्न, वस्त्र, निवारा गरजा लई

लोकसंख्येने पूर्ण होत नाही


गुंडगिरी ,भ्रष्टाचार,मारामारी

त्यात वाढली बेरोजगारी

वाढली भरपूर रोगराई

ह्या लोकसंख्येच्या पाई


वाढले व्यसनाचे प्रमाण

युवा वर्ग झाला व्यसनाधीन

जनता त्रस्त महागाईनं

मानवी हरवले माणूसकीपण


वाढते दारिद्रय, प्रदुषण

नष्ट झाले सारे रान वन

वाढता भार धरतीवर

लोकसंख्येला घाला आवर


Rate this content
Log in