लोभाचा शेवट खड्ड्यात
लोभाचा शेवट खड्ड्यात
आसक्तीचे मुळ! लोभ, परिमळ !
सावळा, गोंधळ ! आयुष्याचा !!1
लाळ गळे त्यांची ! बेचैन, ते जन!
चंचल, ते मन ! आसक्तीने !!2
सतत, धावती ! पैशाचाच रोग !
जीवनाचे, रंग ! विसरली !!3
लालचाला, नाही ! कधीच, विश्रांती !
अहोरात्र, मती ! गुंग, त्यात !!4
धाव, सरड्याची ! कुंपणा पर्यंत !
हाव, जीवनात ! कां, करावी !!5
एक, क्षणाचाही ! इथे, ना भरोसा!
लालचाचा,वसा ! घेतो, कसा !!6
लोभाचा, शेवट ! कायम खड्ड्यात !
आहे, एकमत ! विद्वानांचे !!7
साधुसंत, सांगे ! धर्मग्रंथ, वर्णी !
लोक कर्णोकर्णी ! लागुनही !!8
तृण समान ते ! जड, जवाहिर!
पडला, विसर ! ईश्वराचा !!9
मनुष्य, जन्म हा ! पुनरपि , नाही!
स्वार्थ, आपला ही ! जो तो पाही !!10
"अनिल" म्हणतो ! ध्यानीमनी ठेव!
पाहतो, तो देव ! सर्व, काही !!11
