STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

1  

अमोल धों सुर्यवंशी

Others

लंगोटीया...

लंगोटीया...

1 min
252

गोट्यांचा खेळ खेळायचो

फाटके टायर घेवून

मैलो न मैल सुसाट पळायचो

उसाच्या गाडीच्या मागे

चढून यानडे कुतकुत म्हणायचो.


अभाळासारखी निर्मळ स्वप्न

कागदाच्या नावेसारखी नाल्यात हरवली

बालपण डोळ्यात आठवण बनून राहिल

गावाकडील वाट,

सवंगड्याची साथ हरवली.


शाळा काॅलेजात लय दोस्त भेटले.

लहनपणचे खूप दुरावलेत

मित्र आता फेसबुकवर दिसतात

लाईक आणि कमेंट बनून.

खांद्यावर हात ठेवणारा लंगोटीया

हातात हात मिळतो.

श..शब्द भिंगुर

अमोल धों सुर्यवंशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन