STORYMIRROR

Deepak Ahire

Others

2  

Deepak Ahire

Others

लक्ष्यभेद

लक्ष्यभेद

1 min
62

शक्तीचं संवर्धन करून,प्रेरणा,ऊर्जेच्या बलस्थानी व्हावं एकाग्र,

तेव्हाच यश गाठता येते,नाहीतर होतो व्यवधनाने व्यग्र

ध्येयाच्या दिशेने व्हा कार्यरत,आतल्या आत एकांत शोधावा,

हेच असतं यशाचं रहस्य,ठरवूनच लक्ष्यभेद साधावा

सहाय्य घेत नुसतं पसरू नका,मदत घ्या शक्तिकेंद्राची, 

पसरल्याने बळ व शक्ती होते खर्च,गरज आहे घट्ट राहण्याची

एकच बाण एकावेळी, दोन लक्ष्यांचा घेत नाही वेध,

मन व बाणाची साधावी एकतानता, तेव्हा मिळते यश निर्वेध


Rate this content
Log in