लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन
1 min
226
आतुरता आगमन
गृहलक्ष्मी यावी घरी
धनधान्य समृद्धीने
आरोग्यही नांदो दारी
लक्ष्मी पुजन तयारी
सडा सुरेख रांगोळी
दिपोत्सव परीसरी
उजळते ही दिवाळी
झेंडू पिवळे केशरी
माळा ओवल्या दोऱ्यात
पाने हिरवे आंब्याची
दिसे सुबक दारात
पाच दिवे, कमळ
पाच हळद कुंड
लाल फुले गणपती
पुजा लक्ष्मीची ही मांड
पाट चौरंग सजला
दिप रांगोळी रेखीव
लक्ष्मी विराजली बघ
धन धान्यांचे राजीव
