लक्ष्मी पूजन
लक्ष्मी पूजन
अंतरंगी उजळू दे हा
लक्ष लक्ष दिवा
मनोमनी उजळु दे हा
श्री राम विजयी सोहळा।।धृ।।
अश्विन अंतिम दिनी
घ्यावी मोजुनी त्रैदिनी
कार्तिक तोडी दोदिनी
पंचदिनी हा सोहळा।।१।।
शरद चांदनी ऋतू
गरभा टिपरी ऋतू
नरक वधी हा ऋतू
कृष्ण विजयी सोहळा।।२।।
दिवा धनत्रयोदशी
नि नरक चतुर्दशी
लक्ष्मी पुजना पुजी
दिवाळ सण सोहळा।।३।।
शुभा बलिप्रतिपदी
भाऊबीज ओवाळती
बहिण भाऊ उत्सवी
बळी आनंदी सोहळा।।४।।
धनधान्य धैर्य लक्ष्मी
शौर्य विद्या राजलक्ष्मी
कार्य नि विजया लक्ष्मी
अष्टलक्ष्मी हा सोहळा।।५।।
लक्ष लक्ष अंतरंगी
लक्ष लक्ष बहुरंगी
राम सीता लक्ष रंगी
लक्ष कौतुक सोहळा।।६।।