लक्षात तुम्ही असू द्या
लक्षात तुम्ही असू द्या
हे लेकरांनो, कळकळीने सांगते
जन्म तुम्हाला दिलाय त्यांनी
लक्षात तुम्ही असू द्या
सुंदर जग दाखवलं त्यांनी
लक्षात तुम्ही असू द्या
रस्त्यावर न सोडता आश्रय त्यांनी दिला आहे
ते आहे म्हणून तुम्ही आहेत
लक्षात तुम्ही असू द्या
स्वतः उपाशी राहून तुमची पोट भरली
लक्षात तुम्ही असू द्या
दुःखाची झळ तुम्हाला दिली नाही
विसरू नका त्यांना
हे तुम्ही मात्र लक्षात असू द्या
कितीही मोठे झालात तरी तुम्ह. लक्षात तुम्ही असू द्या
त्यांची लेकर आहात अशा तुमच्या
आईवडिलांना प्रेमाची ऊब तुम्ही द्या
लक्षात तुम्ही असू द्या
आज जशी तुम्हाला गरज आहे
तशी त्यांनाही तुमची गरज आहे
हे तुम्ही लक्षात असू द्या
