STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

लखलखती चांदोरी

लखलखती चांदोरी

1 min
249

लखलखत्या चांदोरीत

जंगी स्वागत झाले नाशिककरांचे


चांदोरीचा ओघवत्या शब्दात

महिमा त्यांनी सांगितला


एकेका वारसास्थळाला भेट देतांना

आताच्या पिढीतल्या वारसदारानेच माहिती त्याची दिली


बारा बलुतेदारांचे गाव 

अजुनही आपली परंपरा पाळता गुणागोविंदाने


दुर्गादेवीचे प्रसन्न मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, राममंदिर, खंडोबा मंदिर, विठ्ठल रूखमाई, मारोती मंदिर

लाकडी खांबाचे अनेक वाडे गावात दिमाखात ऊभे आहेत आजही


दर्शन झाले जगातल्या एकमेव विठ्ठल रूखमाई राही मंदिराचे

प्राचिन पौराणिक चित्रकथा दिसतात रेखाटलेल्या पाहिल्या मिळतात भिंतीवरती


लाकडी सुरेख नक्षीकाम केलेली तीन मजली चावडी

नव्हती पाहीली ह्या आधी कोणत्या गावात


मठकर्याचा वाड्यातील राम मंदिर, शिवमंदीर खास

तेराव्या पिढीतल्या वारसदार भुषणच्याच तोंडून इतिहास पैलु ऐकण्याचे भाग्य जुळून आले खास


हिंगणेंचा वाडा न्यारा आतुन पाहतांना हरखुन गेले भान

घराण्याची गजलक्ष्मीचे दर्शनही झाले छान


अनेक हेमाडपंथी मंदिरे

गोदापात्रात पाण्यात झाली समाधीस्थ

दुरूनच काठावर ऊभे राहुन दिसणार्या कळसाचे घेतले दर्शन


गोदावरीतीरी वसलेल्या गावातुन

नदी वाहते चंद्रकोरी समान


नदीला पुर येता

गावात येत पाणी


सरकारी नियंत्रणावर न अवलुंबून राहण्याचा 

ध्यास घेतल्या नव तरूणांनी


ऊभी केली गावातल्याच तरूणांची एक वानरसेना

पंचक्रोशीत ही देतात ते आपली आपत्ती बचाव सेवा


नव तरूणांनी उचलला विडा 

वारसास्थळ, परंपरा आपणच आपली जोपासायची न कोणापुढे हात पसरवता


चहा नाश्तापाणी देत निरोप दिला नाशिककरांना

परत या राम, बोहडा सोहळा बघण्यास!!!


Rate this content
Log in