STORYMIRROR

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

लीला!

लीला!

1 min
247

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !

खेळत आला जन्मापासून 

तू अदभूतश्या लीला !


दारवान पेंगले उघडली दारे साखळी तुटली

घेउनि तुला वसुदेव निघाला शिरी एक टोपली

झरझरा वाढली यमुनेच्या पाण्याची पातळी 

पदस्पर्श होताच तुझा वाट झाली मोकळी

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !


सुखरुपे तू पोचलास रे नंदाघरी गोकुळी !

योगमाया घेऊनि तात कारागृही परतला !

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !


खाऊनी माती विश्व दावले यशोदामाईला

कालिया मर्दन केले वध पुतनेचा केला

एका करांगुलीवरती गोवर्धनगिरी तोलला

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !


गोप गोपी नादविले केलीस नवनीत लूट

गोपाळाना केले खूष वाटूनि दहीकाला

मथुरेला जाऊनि कंस चाणूर वध केला

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !


पांडवांची केलीस साथ रक्षण धर्माचे केले

द्रौपदीस दिली अक्षयथाळी वस्त्रहरण थांबविले

शिशुपालासी अपराधांचे शासन घडविले

गीता सांगूनी अर्जुना तूच धीट केला

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !


शिखंडीला पुढे धाडूनी भीष्मा नमविले

हाच सुर्य हाचि जयद्रथ अर्जुनास दाखवला

भीमाला ते गुपित सांगुनी दुर्योधन वध घडवला

कर्णाचा रथ भूमीत रुतता ईषारा अर्जुनासी केला

कृष्णा कृष्णा काय सांगू तुझ्या लीला !

खेळत आला जन्मापासून तू अदभूतश्या लीला !


साहित्याला गुण द्या
लॉग इन