लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा
संत तुकारामांनी जे म्हटलंय!
आज सा-या जगाला पटलंय!!१
मज देगा देवा रे ते लहानपण!
मग साखर खावी मूंगी होऊन!!२
नसे ती जबाबदारी, नसे ताण!
आनंद, उत्साहाला येई उधाण!!३
आयते जेवावयास मिळते पान!
खेळायला मोकळे असते रान!!४
राग,रुसवा,क्षणभराचेच भांडण!
विसरून देती मैत्रीचे आलिंगन!!५
अहंकार,दंभ याला नसतो वाव!
निखळ मैत्री,प्रेम स्थायीभाव!!६
जात,धर्म नसे भेद ,रंक वा राव!
रम्य म्हणुनच असे त्याचे नाव!!७
हास्य मधूर उमलते गुलाब फूल!
निर्भय,खिलाडूवृत्तीची मूलं!!८
आळस,निराशा नसे ती दूरदूर!
जीवनात मांगल्य रस भरपूर!!९
