लहान व्हावसं वाटतय
लहान व्हावसं वाटतय
1 min
267
का? कुणास ठाऊक आज लहान व्हावसं वाटतय
गगनभरारी महत्वकांक्षेला वेसन घालावसं वाटतय
रोज रोज सुखाच्या शोधात दु:खच वाढतय
काय ? सुख दुःखाच्या डब्यात असतय
का?कुणास ठाऊक आज लहान व्हावस वाटतय
लाजेचा उंच डोंगर सर करावस वाटतय
लोभ ,मोह सोडून निस्वार्थी व्हावस वाटतय
मीपणा सोडून निरागस व्हावस वाटतय
किती किती हे सोज्वळ बोल अंगाई व्हावस वाटतय
हलक हलक ते ह्रदय घेऊन भिरभिरावस वाटतय
पुन्हा पुन्हा जिद्दीचा साथीदार व्हावस वाटतय
खरच एक परिपूर्ण कलाकृती व्हावस वाटतय
का कुणास ठाऊक आज लहान व्हावस वाटतय
