दोस्ती जीवाची
दोस्ती जीवाची
जिवाभावाची आमची दोस्ती
नाही आम्हाला कुणाची भिती
जातो आम्ही मदतीसाठी
मागतो आम्ही जिंदगी इतरांसाठी
एकजूट हे मित्र पक्षी
उडतात एकमेकांसाठी
जिवाभावाची आमची दोस्ती
नाही आम्हाला कुणाची भिती
मैत्री ही आमची
गुंफूया नाती प्रेमाची
जगूया सुखं सगळ्यांची
हे ,जिवाभावाची आमची दोस्ती
नाही आम्हाला कुणाची भिती
मित्र हे आगळेवेगळे
करु काम निरनिराळे
कधी न होऊ वेगळे
ही प्रार्थना नेहमीची
जिवाभावाची आमची दोस्ती
नाही आम्हाला कुणाची भिती
