जीवनाच्या पाऊलखुणा
जीवनाच्या पाऊलखुणा
1 min
371
बारसं झालं हाता-पायांच्या तालावर
मग दुडूदुडू रांगू लागलो गुडघ्यावर
घेऊन अंगण सारे फैलावर
बघून पराक्रम हा आनंद पसरला घरावर
हळूच पहिले पाऊल पडले कौतुकाच्या धरतीवर।।
नाजूक पावलांनी केली ओळख प्रयत्नांची
प्रयत्नांना जोड मिळे कष्टाची
कष्टाला साथ मिळे गुरूंची
जीवनाला गाठ आहे एका रंगभूमीची
आहे जीवन एक पाऊलखूण रंगभूमीची ।।
