Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Savita Kale

Others

1.0  

Savita Kale

Others

लहान मूल

लहान मूल

1 min
1.2K


आज मलाही अस वाटतं

पुन्हा लहान मूल व्हावं

थकवा, टेंशन, आणि स्पर्धा

यापासून खूप दूर जावं।। १।।


राग, द्वेष काय असतो

सारं काही विसरावं

छोटया छोटया आनंदात

खळखळून हसावं।।२।।


भिती वाटता मनास की

आईला घट्ट बिलगावं

भय सा-या गोष्टींचे

तिच्या मिठीत विसरावं।। ३।।


वाटेल तेव्हा झोपावे नि

वाटेल तेव्हा उठावे

साखर झोपेचे गोड सुख

पुन्हा ते मिळावे।। ४।।



Rate this content
Log in