लग्नाचा वाढदिवस
लग्नाचा वाढदिवस
1 min
274
या जन्मी साथ तुझी मिळाली
माझ्या जीवनाला गती आली
शुभविवाहाच्या पवित्र बंधनात
दोघेही बांधल्या गेलो जीवनात
सुरू झाला एक नवा पर्व
विसरून गोतावळा सर्व
तेव्हा कळाले जीवनाचे मर्म
आपल्या हाती आपले कर्म
दिवस सरले तसे रात्र सरली
लग्नाला अठरा वर्षे पूर्ण झाली
सुखदुःखात दिलीस तू साथ
क्षणोक्षणी हातात तुझा हात
सिंहाचा वाटा माझ्या या यशात
सुखे पेरलीस माझ्या संसारात
एकमेकां समजून वाटचाल केली
वेलीवर दोन फुले उमलली
आभार त्या आई-वडिलांचे
आशीर्वाद लाभो कुलदैवताचे
