STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Children Stories Children

3  

Kavita Sachin Rohane

Children Stories Children

लेकरू

लेकरू

1 min
152

मनमोहक, गोंडस आणि निरागस असं लेकरू जे सारख फिरत असतं आपल्या अवतीभवती..


माहित नसतं त्याला जगाविषयी कारण त्याच स्वतःचच एक जग त्यांनी निर्माण केलं असतं, अस ते अलिप्त लेकरू.......


आई म्हणेल तसच ते करतं कारण माहीत नसत त्याला करायचं तरी काय असत, अस ते अजाण लेकरू .....


डोक्यात असतात हजार प्रश्न त्याच्या, अन् प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडून त्याला हवच असतं, असे ते उत्सुक लेकरू......


जसं मिळेल त्याला वातावरण सभोवती ते तसेच घडण्याचा प्रयत्न करत असतं, असं ते निराकार लेकरू.....


घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच ते अनुकरण करत असतं आणि त्यातूनच ते शिकत असतं, अस ते कृतिशील लेकरू .....


घरातील सदस्य असतात त्याला अति प्रिय कारण त्याचं विश्व हे त्या सदस्यांन पासूनच बनलेलं असतं, अस ते प्रेमळ लेकरू .....


Rate this content
Log in