लेखन...
लेखन...
1 min
4
हवं ते प्रकट करण्यासाठी,बाळगावी लिहिण्याची कला,
स्वतःचा स्वतःशी संवाद, फुलवावी जीवनात लेखनकला
लिहिण्यामुळे लागतं अक्षराबरोबर, विचारांनाही वळण,
लिहिण्यामुळे वाढतं, भाषा सौंदर्याचे भूषण
लिहिणं म्हणजे असतं, चिरंजीव होणं,
लिहिणं म्हणजे जसं, आयुष्य जतन करणं
लिहिणं घडवतं जीवन, समृद्ध करतं इतराचं जगणं,
लिहिणं भिडतं अंतरंगाला, लिहिणं असतं वाहत राहणं
