लेक वंशाची पणती
लेक वंशाची पणती
1 min
382
लेक वंशाची पणती
जरी सारेच म्हणती
तरी आज का लेकींची
कमी येतसे गिणती ?
बाया बापड्यांना वाटे
लेक रांगावी अंगणी
हुंड्यासाठी या लेकीचा
सांगा छळ केला कुणी ?
हल्ली सारे म्हणताती
प्रोत्साहन द्या लेकीला
तरी होई डोळेझाक
तिच्या गुणकौतुकाला
तिच्या आईबापा वाटे
लेक परक्याच धन
सांगा बरे कधी कुणा
कळणार तिचं मन ?
दृष्टिकोण समाजाचा
खरोखर बदलावा
लेक वंशाची पणती
हाचि मंत्र रूजवावा