लेक वंशाची पणती
लेक वंशाची पणती
लेक वंशाची पणती
माया अपार करते
दोन घर सांभाळून
सदा प्रकाश धरते...!!
काळजाचा ती तुकडा
जीव सर्वांना लावते
पैंजणाच्या आवाजाने
घर ते दुमदुमते....!!
लेक घराची रे शान
लेक मायेचा पसारा
लेक प्रेमाची लकेर
तिचा बाणा ही करारा...!
ज्यास आहे लेक तोच
खरा हो नशिबवान
करूनिया कन्यादान
तोच खरा पुण्यवान...!!
लेक आधाराची काठी
लेक मायेचा सागर
चिंता काळजी करते
लेक तुपाची घागर.....!!
लेक पुरवते लाड
लेक वार्धक्याची काठी
सदाकाळ राहतसे
मायबापाच्या हो पाठी....!!
लेक लाडकी लाडकी
लेक वंशाची पणती
सा-या क्षेत्रात भरारी
करू ता-यात गिणती....!!