लढायचं कोरोनाशी
लढायचं कोरोनाशी
किती सांगायचे आता
बघा हद्द पार झाली
ऐका माझ्या बांधवांनो
वेळ मरणाची आली
रोग तो संसर्गजन्य
होतो स्पर्शाने संसर्ग
दैनंदिन व्यवहार
रोग प्रसाराचा मार्ग
यक्ष प्रश्न जगण्याचा
तरि चेष्टा जीवनाची
जानुनबुजुन तुम्ही
वाट चालावी मृत्यूची
रोज अनुभव नवा
तरी वागणे अज्ञानी
नकळत चूकीत रे
होते आता प्राण हानी
झाले जग हतबल
महामारी कोरोनाशी
आता तरी सावध व्हा
ठाम रहा रे स्वताशी
नाही गोळी ना औषध
पाळा पथ्य आरोग्याचे
सोपा आहे उपचार
व्हावे रक्षक स्वताचे
नको कसला घोळका
टाळा फिरणे नाहक
थांबू आपन घरात
रोग मुक्तीचे वाहक
एक निश्चय ठाम रे
लढायचं कोरोनाशी
नको हलगर्जीपणा
एकनिष्ठ कर्तव्याशी
होता वृत्ती समंजस
जनू परीस देशाला
एक मदत निस्वार्थ
रोग मुक्ती मानवाला.
