Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

लावणी रचना

लावणी रचना

1 min
180


तापलेल्या लोखंडावर ताकतीने, घाली धनी घणाचे घाव

रसरसलेल्या विस्तवाची ठिणगी, फुलवत जाई गाव ||धृ||


धनी धिप्पाड बांध्याचा करी धंदा लोहाराचा

दिसभर भट्टीपुढे लोहावर घाव घालण्याचा

हलविते भाता भट्टीचा, ओठी धन्याच्या सदा माझे नाव

रसरसल्या विस्तवाची ठिणगी फुलवत जाई गाव ||१||


बनवितो विळे खुरपी औजारं खपूनी दोघे

बापजाद्याची जमीन आमची बिघे दोन बिघे

बसा खेटूनी धनी जवळी माझ्या रंगवूया हा नवा डाव

रसरसल्या विस्तवाची ठिणगी फुलवत जाई  गाव ||२||


बयत्याची जात ही आमची कष्टकऱ्यांची 

बनवूनि देतो लोखंडी औजारं शेतकऱ्यांची सकाळच्या पारीलाच भट्टीच्या मुशीला चढतोय लै ताव 

रसरसल्या विसरण्याची ठिणगी फुलवत जाई गाव ||३||


Rate this content
Log in