लाटा
लाटा
1 min
246
हा सागरी किनारा
वेडावतो मनाला
ती लाट परतूनी ये
त्यालाच भेटण्याला
कधी भेटते किनारी
कधी वाटेतच वळते
हे गुज अंतरीचे
कोणासही ना कळते
कधी लाट आठवांची
सहजी किनारी येते
मन भिजते अखंड त्यात
गेल्या क्षणात जाते
कधी खवळला समुद्र
लाटाच दाखविती
कधी शांत सागराच्या
ह्रदयात झोप घेती
लाटा न फक्त या हो
वाटे तयास गावे
सरगम ही सागराच्या
मनी घेई हेलकावे
