STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

लालबिंदू

लालबिंदू

1 min
301

छकुली झाली

आई हर्षली

बाबा हर्षले

लक्ष्मीच आली.....


शाळेत गेली

पोर शिकली

नाव काढले

आजी हसली....


लालबिंदू हो

छकुली मागे

आईला दिसे

तिला हो सांगे....


मोठी गं झाली

माझी ही राणी

आजीने दिले

गुळ न पाणी.....


छकुली मोठी

आता हं झाली

देवाच्या पुढे

साखर आली.....


लालबिंदूने

झाली छकुली

न्हाती आता

तीच नटली...


दर्पणी दिसे

लावण्यवती

तिचीच छबी

ती न्याहाळती...


काही काळाने

लग्न लागले

संसारी दोघे

छान रमले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन