STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

लाज वाटते माणूस म्हणून घेण्याची

लाज वाटते माणूस म्हणून घेण्याची

1 min
433

लाज वाटते आज माणूस म्हणून घेण्याची

नात्यातला पूर्वीचा ओलेपणा

हरवत चालला आज

ह्या युगात जो तो

अडकले तांत्रिक युगात

माया, ममता, प्रेम, माणुसकी, आपुलकी

ही हरवत चालली ह्या युगात

आपण म्हणतो की, माणूस शिकला

पण कुठे गेला त्याचं हा सुसंस्कृतपणाचा आव

नक्की आपण कोण आहोत

वेळ आली आहे हे ओळखण्याची

जागेपणी आपण पैसे देऊन आनंद विकत घेता

आणि आपल्या माता पित्यंना

वृद्धाश्रमात टाकून देता

आणि शेवटी आपण चौकोनी कुटुंबात

आनंदात वावरत फिरता

हा तुमचा कसला आलाय सुसंस्कृतपणा

आणि मग काय करता

ह्या एकाकीपणाच्या भीतीने आपण या जिवंतपणी यातना भोगताय

उठ माणसा जागा हो

शोध स्वतःमधली माणुसकी


Rate this content
Log in